lek ladki yojana – लेक लाडकी योजना 2025 – मुलींसाठी सरकारकडून थेट ₹1,01,000 ची मदत!

Table of Contents

जर तुमच्या घरी मुलगी जन्माला आली असेल, तर तिच्या संगोपन, शिक्षण आणि आरोग्यासाठी आता सरकारकडून थेट आर्थिक मदत मिळणार आहे.

lek ladki yojana

भारतात अजूनही मुलींच्या जन्माकडे काही ठिकाणी दुय्यम नजरेने पाहिलं जातं.
मुलगा झाला तर घरात आनंद, पण मुलगी झाली की काहीजण चिंतेत पडतात –
“लग्नासाठी पैसे कुठून आणायचे?”,
“शिक्षणासाठी खर्च कसा करायचा?”

या मानसिकतेत बदल घडवण्यासाठी आणि मुलींचं शिक्षण, आरोग्य आणि भविष्यातील स्वावलंबन यासाठी महाराष्ट्र सरकारने “लेक लाडकी योजना 2025” जाहीर केली आहे.

या योजनेत मुलगी जन्मल्यापासून ते तिच्या शिक्षण आणि लग्नापर्यंत सरकारकडून थेट ₹1,01,000 ची आर्थिक मदत दिली जाणार आहे.

ही योजना नेमकी काय आहे?

लेक लाडकी योजना म्हणजे मुलींसाठी सरकारकडून दिला जाणारा प्रेमाचा हात!
जर 1 एप्रिल 2023 नंतर तुमच्या घरी मुलगी जन्माला आली असेल, तर सरकार तिच्या शिक्षण, पोषण आणि सुरक्षित भविष्यासाठी टप्प्याटप्प्याने ₹1,01,000 रुपये थेट तिच्या बँक खात्यात जमा करतं.

या पैशांचा वापर तुम्ही कशासाठी करू शकता?

  • मुलीच्या जन्मावेळी लागणाऱ्या गोष्टींसाठी
  • लसीकरण आणि आरोग्य तपासणीसाठी
  • शाळेचे शिक्षण
  • पुढील शिक्षणासाठी
  • आणि 18 वर्षांनंतर तिच्या स्वयंपूर्णतेसाठी

योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?

  • मुलीच्या जन्माचं स्वागत करणं
  • लहान वयात लग्न (बालविवाह) टाळणं
  • कुपोषण टाळून तिचं आरोग्य मजबूत करणं
  • गरीब कुटुंबातील मुलींसाठी आर्थिक आधार देणं
  • शिक्षण थांबू नये म्हणून टप्प्याटप्प्याने मदत

पात्रता – कोण अर्ज करू शकतो? lek ladki yojana

जर तुमच्या घरात खालील गोष्टी आहेत, तर तुम्ही अर्ज करू शकता:

  • तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे
  • मुलगी 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेली आहे
  • ती मुलगी पहिलं किंवा दुसरं अपत्य असावी
  • जुळ्या मुली असतील तरी चालेल, पण कुटुंब नियोजन झालेलं असणं गरजेचं
  • आई-वडील महाराष्ट्राचे रहिवासी असावे
  • बँक खाते महाराष्ट्रातच असावं
  • कुटुंबाचा वार्षिक उत्पन्न ₹1 लाखांपेक्षा कमी असावा

अर्ज करताना लागणारी कागदपत्रं:

  • मुलीचा जन्म दाखला
  • आई-वडील आणि मुलीचं आधार कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला (सरकारी किंवा तहसीलदार ऑफिसमधून मिळतो)
  • रेशन कार्ड
  • बँक पासबुक (खात्याचं पहिलं पान)
  • शाळेचा बोनाफाईड दाखला
  • कुटुंब नियोजन प्रमाणपत्र – जुळ्या मुलींसाठी
  • मुलगी अविवाहित आहे, याचं घोषणापत्र – 18 वर्षी अंतिम रक्कम मिळवण्यासाठी

अर्ज कसा करायचा? lek ladki yojana

  1. अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येऊन माहिती देतात
  2. त्या तुमचं पात्रता तपासतात आणि ऑनलाइन अर्ज भरायला मदत करतात
  3. अधिकारी अर्ज तपासतात
  4. जर सर्व योग्य असेल, तर पैसे थेट बँक खात्यात जमा होतात
  5. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आहे आणि कोणतीही दलाली नाही

पैसे कसे आणि केव्हा मिळतात? lek ladki yojana

वय / टप्पारक्कम (₹)कशासाठी?
जन्मावेळी₹5,000 – ₹7,000स्वागत आणि पोषणासाठी
1 ते 6 वर्षे₹10,000 पर्यंतलसीकरण, अंगणवाडी शिक्षण
1ली ते 10वी₹30,000 पर्यंतशाळेचा खर्च
11वी – 12वी₹20,000 पर्यंतपुढील शिक्षण
18 व्या वर्षी₹25,000 – ₹35,000अंतिम रक्कम (मुलगी अविवाहित असल्यास)
lek-ladki-yojna-maharashtra

lek ladki yojana

ही योजना का निवडावी?

  • मुलगी जन्मली की तिच्या शिक्षण, पोषण, लग्नाची चिंता घरात असते
  • या योजनेमुळे सरकार मुलीच्या भविष्यासाठी थेट मदत करतं
  • पैसे थेट बँकेत जमा होतात – त्यामुळे कोणताही दलाल नाही
  • शिक्षण आणि आरोग्यासाठी उत्तम आर्थिक पाठबळ
  • गरीब कुटुंबांसाठी हे खूप मोठं बळ आहे

इतर राज्यांतील अशा योजना

  • मध्यप्रदेश: लाडली लक्ष्मी योजना
  • राजस्थान: राजश्री योजना
  • हरियाणा: बेटी बचाओ बेटी पढाओ
  • दिल्ली: लाडली योजना

महाराष्ट्राने यापेक्षा मोठं पाऊल उचलून ₹1,01,000 ची थेट मदत जाहीर केली आहे.

मदतीसाठी कुणाशी संपर्क साधावा? lek ladki yojana

अंगणवाडी सेविका – त्या अर्ज करण्यासाठी मदत करतात
ग्रामपंचायत / महिला व बालविकास विभाग – अंगणवाडी नसल्यास
अधिकृत वेबसाइटhttps://wcd.maharashtra.gov.in

ग्रामसभा / लोकशाही दिन – इथेही माहिती मिळते

एक महत्त्वाची गोष्ट – लक्षात ठेवा!

जर तुमच्या घरी 1 एप्रिल 2023 नंतर मुलगी जन्मली असेल,
तर ही योजना म्हणजे तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे!

आता पुढे काय?

सर्व कागदपत्रं तयार ठेवा
जवळच्या अंगणवाडी सेविकेशी संपर्क करा
अर्ज भरून प्रक्रिया सुरू करा
तुमच्या लेकीसाठी मजबूत भविष्य घडवा

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्र.१: ही योजना कोणासाठी आहे?
महाराष्ट्रातील सर्व मुलींसाठी.

प्र.२: मदत कधी मिळते?
जन्म, १०वी, १२वी आणि पदवी पूर्ण झाल्यावर.

प्र.३: लग्न १८ वर्षांपूर्वी झाल्यास मदत मिळेल का?
नाही.

प्र.४: ऑनलाईन अर्ज कुठे करायचा?
ladkibeti.maharashtra.gov.in

प्र.५: कागदपत्रं नसेल तर काय?
ग्रामसेवक/तलाठी यांच्याकडून पुरावा मिळवावा लागतो.

हे वाचा : – गोठा बांधणीवर मिळणार थेट 77,000 रुपयांचं अनुदान! शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा असा करा अर्ज!